बारामती : भाजपला पाठिंबा देवुन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.मात्र,राज्यात अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलुन गेली. सत्तेत जाण्याच्या आनंदात असणाऱ्या राजकीय पक्षांना,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का बसला आहे.अजित पवार यांची बंडखोरी झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा देखील जल्लोष बारामतीत रंगला नाही .तसेच , सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसने या घडमोडींचा निषेध केला आहे. लोकसभा,विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावुन काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला आजचा राजकीय धक्काचवणे जड गेल्याचे चित्र आहे.
बारामती शहरातील गुणवडी चौक येथे कालपर्यंत उत्साहाचे वातारवणहोते.मात्र, आज मुंबईत राजकीय भुकंप झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेसंतप्त झाले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर गुणवडी चौक येथे काळाझेंडा फडकावुन अजित पवार यांच्या भुमिकेचा निषेध केला.मात्र, पोलिसांनी तत्काळ धाव घेत राजकीय संघर्ष टाळण्यासाठी हा काळा झेंंडा काही वेळातचकाढुन घेतला.शिवसेनेच्या गोटात मात्र शांतता होती.