शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
4
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
5
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
6
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
7
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
9
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
10
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
11
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
12
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
13
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
14
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
15
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
16
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
17
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
18
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
19
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
20
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले

रेशन दुकानातच काळ्याबाजाराने विक्री

By admin | Published: July 09, 2015 2:21 AM

सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे रेशनचे धान्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘काळ्याबाजारा’ने थेट रॉकेल व धान्याची विक्री सुरू आहे.

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे रेशनचे धान्य देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये ‘काळ्याबाजारा’ने थेट रॉकेल व धान्याची विक्री सुरू आहे. दोन व तीन रुपये किलोचे धान्य पाच ते सहा पट किमतीने आणि रॉकेल चार पट किमतीने सर्रास काळ्याबाजाराने विकले जात असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने शहर आणि ग्रामीण भागात केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आले.रेशनवरील धान्याला केवळ गोडावूनमधूनच पाय फुटतात असे नाही, तर प्रत्यक्ष दुकानात गेल्यावरही ते ज्यांचा हक्क आहे, त्या गरजवंतांच्याच हातात पडेल, याची शाश्वती राहिली नसल्याचे यातून दिसून आले आहे. केंद्र शासनाने ‘अन्नसुरक्षा कायदा’ लागू केल्यानंतर, प्रती व्यक्ती सरासरी तीन ते पाच किलो धान्य दोन आणि तीन रुपये किलो दराने दिले जाणे अपेक्षित आहे; परंतु त्यांना धान्य देण्यास टाळाटाळ करीत काळ्याबाजाराने विक्री करून, जादा नफा मिळविण्याचे प्रकार घडत आहेत. एका बाजूला अन्नधान्य वितरणकडून कारवाई करण्याचा इशारा दिला जात असताना, राजरोसपणे काळाबाजार सुरू असल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचा (मोका) कायद्या अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे; मात्र हे गांभीर्याने घेतला गेलेला नाही, असेच चित्र आहे. > लोकमतच्या वतीने पुणे शहरात शिवाजीनगर, गोखलेनगर, पर्वती, गंजपेठ, रास्तापेठ भागातील काही रेशनिंग दुकानांमध्ये, तर ग्रामीण भागात खेड, राजगुरुनगर, भोसरी भागातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन रेशनकार्ड नसताना धान्य मिळते का, याची विचारणा केली. त्या वेळी काळ्याबाजाराने जादा भाव देऊन धान्य दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. >  लोकमत प्रतिनिधी यांनी शहर व जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशनिंगच्या धान्याच्या विक्रीची पाहणी केली. रेशनकार्डशिवाय धान्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्वस्त धान्य दुकानात काळ्याबाजाराने थेट धान्यांची विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. > लोकमत प्रतिनिधी यांनी शहर व जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशनिंगच्या धान्याच्या विक्रीची पाहणी केली. रेशनकार्डशिवाय धान्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी स्वस्त धान्य दुकानात काळ्याबाजाराने थेट धान्यांची विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. कट्टा सातशे-आठशे रुपयांना...आम्ही येथे नवीन राहायला आलो... रेशनकार्ड तिकडे गावाकडचे आहे.. इडलीसाठी पाच किलो तांदूळ पाहिजे... हो मिळेल... कसे किलो... पंधरा रुपये... कमी नाही का... नाही पंधरा रुपयांनीच मिळेल.... रेशनिंगचेच आहेत ना...हो.....कट्टा पाहिजे असेल तर... येथे मिळत नाही, पण तालुक्याच्या गोदामाच्या ठिकाणी गेल्यावर तेथे काम करणाऱ्या पोरांना भेटा... मिळेल..सातशे-आठशे रुपयांना....रॉकेल ६0 रू...काळ्या बाजाराचाच भावपुण्यात गोखले नगर परिसर... रेशनिंगचा आधार लिंकचा अर्ज पाहिजे होता... रेशनकार्ड कुठे आहे.. येथे नाही...नवीन काढायचं.... येथे नाही मिळणार.. शिवाजीनगर येथे जा... काही धान्य मिळेल का... नाही.. पण रॉकेल मिळेल... किती पाहिजे... एक लिटर द्या..... साठ रुपये लिटर.... इतके महाग... हो काळ्याबाजाराचा रेट हाच आहे....गहू १२ व तांदू ( १८ रूपये...)रेनशिंगच्या धान्याची चौकशी करायला आले... धान्य आले नाही... संप सुरू आहे... नाही माझ्याकडे रेशनकार्ड नाही... आम्ही येथे नवीन आलोय राहिला.... काय पाहिजे.... गहू आणि तांदूळ..... काय भाव... गहू १२ रुपये.. तांदूळ १८ रुपये आणि साखर २६ रुपये... तांदूळ द्या आता एक किलो.... कट्टा पाहिजे असेल तर... संध्याकाळी या... कट्टा पण मिळेल.