शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

काळा पैसावाल्यांना हादरा

By admin | Published: November 09, 2016 2:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे सर्जिकल स्ट्राइक या उद्देशाने मंगळवारी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचे सर्जिकल स्ट्राइक या उद्देशाने मंगळवारी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांना या नोटा बँकेत जमा करण्याची ५० दिवसांची मुदत दिली. ही माहिती मिळताच अनेकांचे धाबे दणाणले. घरातील हजार-पाचशेंच्या नोटांचा समावेश असलेल्या मोठ्या रकमेचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून काहींनी कोट्यवधींचा काळा पैसा जमा करून ठेवला आहे. एवढी मोठी रक्कम बँकेत जमा करता येत नाही. भविष्यात वापरातही येणार नाही. त्यामुळे नेमके काय करायचे, असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दोन दिवस बँका व एटीएम बंद राहतील, असे नमूद केल्याने व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. एटीएम केंद्रात नोटा स्वीकृतीच्या यंत्रांवर काहींनी तर रात्रीच धाव घेतली. हजार, पाचशेच्या नोटा त्या यंत्रात जमा केल्या. नोटांचा भरणा करण्यासाठी अक्षरश: रात्री गर्दी उसळली. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, अशांनी खासगी पतसंस्था, सहकारी बँकांकडे धाव घेतली. आपल्याकडील रक्कम त्या पतसंस्थेत आणि सहकारी बॅँकेत भरण्यास प्राधान्य दिले. जमीन खरेदी विक्री करणारे एजंट, रिअल इस्टेट व्यावसायिक ज्यांची दिवसाची आर्थिक उलाढाल मोठी आहे, अशांचे धाबे दणाणले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम भरताना पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅनकार्डशिवाय मोठी रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बेहिशेबी मोठी रक्कम बँकेत भरायची झाल्यास पैसे कोठून आले हे प्राप्तिकर खात्याला दाखवून देणे भाग पडणार आहे. आतापर्यंत प्राप्तिकर खात्याची दिशाभूल करून शासनाचा कर न भरणाऱ्यांना काळा पैसा लपविणे अवघड जात आहे.(प्रतिनिधी)