शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

सोशल मीडियावर ‘ब्लॅक आऊट’ : महिला अत्याचाराला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:07 PM

तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध सोशल मीडियावर सोमवारी फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर अनेक महिलांनी सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत ‘ब्लॅक आऊट’ ब्लॅक आऊटबाबत सोशल मिडियावर विविध प्रकारची मते महिला अत्याचाराच्या, घरगुती हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : स्त्री शिकली, प्रगती झाली! पण, खरंच तिची प्रगती झाली का? एकीकडे ‘ती’ विविध क्षेत्र पादाक्रांत करत असताना दुसरीकडे तिच्यावर होणा-या अत्याचाराच्या हेलावून टाकणा-या घटना दररोज घडतच आहेत. शासनाची उदासिनता...कायद्याच्या अंमलबजावणीचा अभाव...की समाजाची असंवेदनशीलता? अशा घटनांचा निषेध करायलाच हवा. सुरुवात तर करायलाच हवी...स्वत:पासून. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध म्हणून सोशल मीडियावर सोमवारी दिवसभर ‘ब्लॅक आऊट’ पहायला मिळाला. या कँपेनमध्ये अनेक नेटिझन्सनी उत्स्फुर्त सहभाग घेत फेसबूकवरील प्रोफाईल फोटो ‘ब्लॅक आऊट’ केला. लैंगिक आणि घरगुती हिंसेविरुद्ध हा ब्लॅक आउट पाळण्यात आला.प्रगत म्हणवणाऱ्या एकविसाव्या शतकाचे दिंडोरे पिटले जात असताना स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि मानसिकता अजूनही बुरसटलेलीच आहे. दररोजचा प्रवास, आॅफिस, रस्ता, एवढेच काय घरातही स्त्रीला पावलोपावली लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण, निमशहरी, शहरी भागातील प्रत्येक स्तरातील स्त्रीला आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव आलेला असतो. वर्तमानपत्र उघडले की महिलांवरील अत्याचाराच्या घटना मनाला चटका लावून जातात. तीन वर्षाची चिमुरडी असो, तरुणी असो, महिला की वृध्दा, कोणीच सध्याच्या जगात सुरक्षित नाही, हे वास्तव या घटनांतून अधोरेखित होत आहे. अत्याचाराच्या घटनांवर विविध माध्यमांतून टीका होत राहते. नराधमांना शिक्षा व्हावी, यासाठी कँडल मार्च, शासनाला विचारलेला जबाब, विविध माध्यमांतून व्यक्त झालेला संताप, याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर अनेक महिलांनी सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत आपला प्रोफाईल फोटो काढून टाकून त्याऐवजी काळा चौकोन निवडला. या जगात महिलांचे अस्तित्वच उरले नाही, तर काय होईल, याची कल्पना करावी, या उद्देशाने ‘ब्लॅक आऊट’ पाळण्यात आला.ब्लॅक आऊटबाबत सोशल मिडियावर विविध प्रकारची मते नोंदवण्यात आली. केवळ प्रोफाईल फोटो काळा करुन परिस्थिती बदलणार आहे का, असा सवाल काहींनी उपस्थित केला. दुसरीकडे, निषेधाची सुरुवात आपल्यापासून करायला काय हरकत आहे, असा मतप्रवाहही यावेळी पहायला मिळाला. या कँपेनमध्ये केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी या कँपेनबाबत ‘गूगल सर्च’ करुन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.--------------महिला अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराविरोधात सोशल मिडियावर ब्लॅक आऊट पाळण्यात आला. अनेकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेत फेसबूकवरील प्रोफाईल फोटो काळ्या रंगाचा चौैकोन ठेवला. प्रत्येक वेळी एखादे कँपने एखाद्या संस्थेने अथवा व्यक्तीने आवाहन केल्यावरच का पाळले जावे? स्वयंस्फुर्तीने निषेध नोंदवून आपल्यापासूनही सुरुवात करता येईल. यामध्ये केवळ महिलाच सहभागी झाल्या असे नव्हे, तर महिला अत्याचाराला विरोध करणा-या पुुरुषांनीही यामध्ये सहभाग घेतला.-मुक्ता चैैतन्य, लेखिका--------------------महिला अत्याचाराच्या, घरगुती हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला कुठेच सुरक्षित नाहीत. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर या घटनांचा निषेध नोंदवायला हवा. सोशल मिडिया हे सध्याचे अभिव्यक्तीचे महत्वाचे व्यासपीठ बनले आहे. ‘ब्लॅक आउट’च्या माध्यमातून आम्ही सर्व मैैत्रिणींनी आमच्या स्तरावर निषेध नोंदवला. नेटिझन्सकडून या कँपेनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.- शमिका जोशी 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ