लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव मूळ : पुणे शहरातून येणाºया मुळा-मुठा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात येत असल्याने वर्षानुवर्षे नद्यांचे प्रदूषण ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. रसायनयुक्त व सांडपाणी सोडल्यामुळे पुण्यातून येणारी नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पाणी फेसाळलेले आहे.पुणे शहरातील गटारांचे पाणी, बेसुमार सुरू असलेला वाळूउपसा, जलपर्णींचा विळखा व औद्योगिक प्रदूषित पाणी तसेच महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पांमधील मैलामिश्रित पाणी खुलेआम नदीपात्रात सोडण्यात येते. यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे.या काळ्या पाण्याची शिक्षा नदीकाठच्या गावातील शेतकºयांनी अजून किती दिवस भोगायची? असा प्रश्न नदीतीरावरील ग्रामस्थांनी केला आहे. खडकवासला धरणातून पावसाळ्यात अतिरिक्त झालेले पाणी वगळता एक थेंबदेखील पाणी नदीपात्रात सोडले जात नाही. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेऊन वर्षातील सुमारे आठ महिने सांडपाणी, मलजल व कारखान्यातून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी महापालिका नदीपात्रात सोडून देते. याचबरोबर हजारो टन कचराही येथेच टाकला जातो.मुळा-मुठा नदीचे पाणी दौंड, बारामती आणि उजनीचे पाणी थेट सोलापूरपर्यंत जात असल्याने नदीकाठच्या गावांना सक्तीने रसायनयुक्त दूषित पाणी प्यावे लागते.
‘काळ्या पाण्या’ने मुळा-मुठा फेसाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:54 AM