अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:03 PM2018-03-14T22:03:32+5:302018-03-14T22:03:32+5:30

पुणे महापालिकेतील अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली आहे.

Black years of opposition due to darkness: Mukta Tilak | अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

Next
ठळक मुद्देवर्षपुर्तीनिमित्त भाजपाचा कामकाजाचा आढावायोगेश मुळीक : आगामी वर्षात सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार

पुणे : अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यापुढे अंधारी आली आहे. वर्ष पुर्ण झाले तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करत आहेत अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली. महापालिकेतील वर्षभराच्या सत्ताकाळात मागील पंधरा वर्षात झाली नाहीत तेवढी मोठी व महत्वाची कामे झाली आहे, असा दावा त्यांनी केला. 
स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापालिकेत १५ मार्च २०१७ रोजी महापालिकेतील महापौर व अन्य सत्तापदे भारतीय जनता पार्टीने ग्रहण केली. त्याच्या वर्षपुर्तीनिमित्त महापालिकेत महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, मंजूषा नागपुरे आदी यावेळी उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी वर्षभरातील विविध कामे सांगितली व गोगावले यांनी पक्षाचे वर्षभरातले काम उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिले.
महापौरांनी मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन योजना, नदीसुधार योजना आदीविषयी महापौरांनी सांगितले. मुरलीधर मोहोळ यांनी मिळकतकर देणाऱ्या कुटुंबप्रमुखासाठीची अपघात विमा योजना, वैद्यकीय तसेच परिचारिका महाविद्यालय या योजनांचा आढावा घेतला. सर्व मोठ्या योजनांचे काम सुरू असून त्यातील काही पुर्णत्वाला येत असल्याचे ते म्हणाले. भिमाले यांनी मिळकत कर विभागाचे उत्पन्न जीआयएस यंत्रणेमुळे वाढले असल्याचा दावा केला. कॅन्सरमुक्त पुणे, लहूजी वस्ताद स्मारक, शिवसृष्टी या योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश मुळीक यांनी आगामी वर्षात सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. 
शहराध्यक्ष गोगावले यांनी पक्षाचे काम महापालिकेत जाहिरनाम्यानुसार सुरू असल्याचे सांगितले. वाहनतळ धोरण प्रशासनाने आणले आहे, त्याला आम्ही अनेक सुचना केल्या आहेत. दर वाढणार नाहीत असा दिलासा त्यांनी दिलाय दुमजली पार्किंगचा तसेच दुचाकींना सवलत देण्याचा पर्याय दिला आहे असे ते म्हणाले. पक्षाच्या अमलबजावणी समितीने सुधारणा करून दिलेल्या योजनाच पदाधिकारी पुढे आणतात, त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन त्या मंजूर होतात. याच पद्धतीने आगामी ४ वर्षात कामे सुरू राहील असे गोगावले यांनी सांगितले
...
शिवसृष्टी बीडीपीत होणार आहे. त्याच नव्हे तर संपुर्ण शहराच्या बीडीपी धोरणाविषयी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार, खासदार यांनाही त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात चर्चा होईल व नंतर मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल. या महत्वाच्या विषयावर त्यानंतरच निर्णय होईल असे भिमाले यांनी सांगितले.

Web Title: Black years of opposition due to darkness: Mukta Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.