शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

दृष्टिहीन विद्यार्थ्यांचे डोळस यश

By admin | Published: May 31, 2017 2:57 AM

बारावीच्या परीक्षेसाठी कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसताना डोळस विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत निवांत संस्थेच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बारावीच्या परीक्षेसाठी कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसताना डोळस विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत निवांत संस्थेच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी डोळस यश मिळवले आहे. संस्थेतील १९ विद्यार्थ्यांनी कला शाखेत तर ५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.विश्रांतवाडी परिसरात टिंगरेनगर येथे निवांत ही संस्था गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अंध विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करते. अंधत्त्वामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निवांत संस्थेकडून आधार दिला जाते. त्यात काही अनाथ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या स्वत:च्या पायावर उभे रहावे लागते. निवांत संस्थेने अशाच निराधार विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.निवांत संस्थेच्या मीरा बडवे म्हणाल्या, कुटुंबाकडून व समाजातून कोणताही आधार न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना संस्थेने उभे केले आहे. संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार केली आहेत. फर्ग्युसन, वाडिया, गरवारे यांसारख्या महाविद्यालयात संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला. त्यामुळे यंदाही बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.संस्थेमधील प्रियंका गायकवाड ८० टक्के, भाग्यश्री खंदादे ७८, अविनाश शिंदे ७२.६ ,मोनिका काळेले ७२.५, पांडुरंग जांबे ६८.५, जालिंदर मंगळवेढेकर ६८, अजय शिंदे ६७.२, योगेश घुटे ६६.८ यांनी यश मिळवले आहे. तसेच किरण सोलुंके, राजू दास, पवन नांगरे, अंकुश नांगरे, शुभांगी अंकूश, हुसेन शेख, भाग्यश्री पवार, प्रमोद शैलाले, अमोल माकर, सागर निकम, दत्ता ढोमरे यांनी कला शाखेत यश मिळवले आहे. तसेच प्रियंका केंद्रे ७६.६ टक्के, शंकर भोईटे ७१.१, अभिजित कसबे ७३.१, तेजस मते ७०.२ टक्के मिळवत वाणिज्य शाखेत यश मिळवले आहे. तसेच अनिकेत राऊत याने ६४.३ टक्के गुण प्राप्त केले.