पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्याजवळील दरडींचे धोकादायक स्थितीतील दगड काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी दि. १२ ते २० मार्च या कालावधीत दररोज सकाळी १० ते ३.१५ या वेळेत १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेतले जाणार आहेत. या कालावधीत मार्गावरील वाहतुक बंद करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.दु्रतगती मार्गावर सातत्याने धोकादायक दरडींचे दगड हटविण्याचे काम केले जाते. तसेच दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना केल्या जातात. दि. १२ ते २० मार्च दरम्यान खंडाळा बोगदा परिसरात धोकादायक दगड काढण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. त्यासाठी या कालावधीत दररोज सकाळी १० ते १०.१५, ११ ते ११.१५, दुपारी १२ ते १२.१५, २ ते २.१५ व ३ ते ३.१५ या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. या वेळेत प्रत्येकी १५ मिनिटांसाठी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच दि. १५ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजल्यापासून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतुक चालु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली.--------------
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 7:49 PM