पुणे : तळेगाव टोकनाका येथून जुन्या महामार्गाला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंडीत सुट्टे झालेल्या दरडी काढण्याचे काम मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे़. त्यामुळे या मार्गावर दर तासांनी १५ मिनिटे ब्लॉक घेतला जाणार असून वाहतूक थांबविण्यात येणार आहे.उर्से खिंडीतील दरडी निखळल्या आहेत़ पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये, म्हणून त्या उतरविण्यात येणार आहे़. हे काम दोन टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा मंगळवार १४ ते ते शुक्रवार १७ मे आणि दुसरा टप्पा मंगळवार २१ मे ते गुरुवार २३ मे दरम्यान हे करण्यात येणार आहे़. या दिवशी प्रत्येक तासाला १५ मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे़ द्रुतगती मागार्पासून जुन्या महामार्गाच्या दरम्यान उर्से खिंड येथून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी तसेच आजू बाजूच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे़. वाहतूक बंद ठेवण्यात येणाऱ्या वेळा : सकाळी १० ते १०.१५, ११ ते ११.१५दुपारी १२ ते १२.१५, १ ते १.१५, २ ते २.१५, ३ ते ३.१५सायंकाळी ४ ते ४.१५
दरडी काढण्याच्या कामामुळे पुणे -मुंबई एक्सप्रेसवे वर ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:23 PM
उर्से खिंडीतील दरडी निखळल्या आहेत़ पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये, म्हणून त्या उतरविण्यात येणार आहे़.
ठळक मुद्देपहिला टप्पा मंगळवार १४ ते शुक्रवार १७ मे आणि दुसरा टप्पा मंगळवार २१ मे ते गुरुवार २३ मेप्रत्येक तासाला १५ मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार