कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जैन बांधवांनी महावीर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आणि गेली २२ वर्षांपासून असलेली रक्तदान शिबिराची परंपरा कायम ठेवून पुणे येथील लोकमान्य ब्लड बँक यांच्या सहकार्याने सोमवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३६५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना आरोग्य किट देण्यात आले.
या रक्तदान शिबिराला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, तालुकाप्रमुख माउली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेश मेहेर यांनी भेट दिली.
या शिबिराचे नियोजन आयोजन जैन सकल संघाचे अध्यक्ष मनोज दर्डा, अशोक गांधी, संदीप मुथा, जैन सोशल क्लबचे अध्यक्ष अभय कोठारी, धनेश शेलोत, शुभम मुथा, शुभम मुनोत, आनंद कटारिया, यश खिवंसरा, चेतन कर्नावट, प्रीतेश खिवंसरा, स्वप्निल भन्साळी, सुयोग गांधी, ज्योती गांधी, हेमा लोढा, कविता देसरडा, सविता गुगळे, स्नेहल कांकरिया, भारती खिवंसरा, शिल्पा दर्डा, वैशाली कोठारी, तसेच विनायक चौधरी, सुनील मुंडे, राहुल पाटे, ललित पाटील यांचे सहकार्य लाभले.
--
फोटो क्रमांक : २७ नारायणगाव महावीर जयंती रक्तदान
फोटो : भगवान महावीर जयंतीनिमित आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना आरोग्य किट देताना आ. अतुल बेनके, सूरज वाजगे, गणेश वाजगे, अशोक गांधी आदी.