शिबिराची सुरुवात सरपंच दिलीप देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पांढरे यांच्या हस्ते करण्यात आली. राहू येथे कोरोना लसीकरण होऊनही युवकांनी रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. संकलन केलेले रक्त सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन जिमखाना, पुणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
सह्याद्री ब्लड बँकेच्या अनघा पळसकर यांनी बहुमूल्य सहकार्य लाभले. शिबिराचे आयोजन शंभुराजे युवा प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, दौंड तालुका पत्रकार संघ, किराणा व्यापारी असोसिएशन, श्रीविशल्या नर्मदा सेवा समिती, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी माजी सरपंच मनिषा नवले, ग्रामसेवक गोरख थोरात, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, लक्ष्मण कदम, श्रीराम कुल, भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, प्रसाद खुंटे, शंभुराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज नवले, आरोग्यसेविका उषा सावके, हर्षल चव्हाण, खंडू रणदिवे, तुषार ढमढेरे, निखिल काळभोर, सुनील भटेवरा, अतुल तांबे, धरमचंद भटेवरा,कल्याण तांबे आदी उपस्थित होते.
...................................................................................................................
210921\img-20210918-wa0017.jpg
सोबत फोटो...