सहभाग नोंदविला.
कोरोनासारख्या साथीच्या आजाराने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. यांसारख्या आजारात रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते अशा वेळी रुग्णांना रक्त कमी पडू नये याचा एक भाग म्हणून दुर्गम डोंगरी भागातील म्हाळवडी ग्रामस्थ व भोर युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा म्हाळवडी येथे अक्षय ब्लड सेंटर मिरजच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, या वेळी ८१ रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद नोंदविला. विशेष म्हणजे, महिला रक्तदान करण्यासाठी पुढे आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिलनाना सावले, समाधान देशमुख,म्हाळवडी गावचे सरपंच दत्ता बोडके, लहू बोडके, सदानंद बोडके, बापू कुढले, समीर घोडेकर, मनोज धुमाळ, सोपान दानवले, सोपान बैलकर, योगेश खंडाळे,
युवराज जेधे, संदीप खाटपे, राहुल पवार, सुशांत बोडके,सुनील चिकने,विजय शेटे, इत्यादी उपस्थित होते.
---