या कठीण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपून व माणुसकी टिकून राहावी म्हणून तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने केशवनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चेतन तुपे, माजी उपमहापौर व नगरसेवक बंडू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य शक्ती प्रधान, जितीन कांबळे, ईशान तुपे, राहुल प्रधान, संतोष शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद पाटील, दिलीप भंडारी, अनिल भांडलवकर, माऊली मोरे, सुशील अक्काले, गणेश ढाकणे, प्रवीण प्रधान व कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात एकूण ८२ रक्तदात्यांनी व अँटिबॉडीज तपासणीत १५ तरुणांनी सहभाग घेतला. या शिबिराला विशेष सहकार्य पुणे ब्लड बँकचे मिळाले.
केशवनगर मुंढवा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सामजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला वाफेचे मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले.