अष्टविनायक प्रतिष्ठान लोणी काळभोर (ता. हवेली) यांचे वतीने येथील आठवडा बाजाराच्या जागेत रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी मोकाशी बोलत होते. याप्रसंगी शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, विश्वराज हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम आगरवाल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, राजेंद्र बाप्पू काळभोर, पूर्व हवेली डाॅक्टर संघटनेचे अध्यक्ष डाॅ. राहुल काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, शिवसेनेचे रमेश भोसले, संतोष भोसले, राजेश काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रताप बोरकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, सुनील गायकवाड, कविता जगताप, बकुळा केसकर, माजी सदस्य बाळासाहेब काळभोर, विजय ननवरे, संजय भालेराव उपस्थित होते.
या वेळी बोलताना राजेंद्र मोकाशी पुढे म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजर, वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. पोलीस आल्यावर मास्क लावायाचा व पोलीस गेल्यावर मास्क काढायचा, हे बरोबर नाही. यामुळे तुम्ही पोलिसांना फसवत नसून स्वतःला फसवत आहात. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.
रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी अष्टविनायक प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. यावेळी १३५ बाटल्या रक्त
संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश काळभोर यांनी तर उपस्थित पाहुण्यांचे व रक्तदात्यांचे आभार प्रशांत काळभोर यांनी मानले.
--
१६लोणी काळोभोर रक्तदानी शिबिर
फोटो ओळी : लोणी काळभोर येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र मोकाशी, विक्रम आगरवाल, प्रशांत काळभोर आदी.