सध्या कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निघोजे येथे कोविड महामारीमध्ये रक्तसंकलनासाठी माजी उपसरपंच आशिष येळवंडे युवा मंच व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ५१ बाटल्या संकलित करण्यात आल्या.
चाकण ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान साह्याने आशिष येळवंडे यांनी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते (पाटील) यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ, उपसरपंच जितेंद्र आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वामी येळवंडे, रामदास येळवंडे( मा उपसरपंच), निलेश पवार(मा.उपसरपंच),आणि सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य सहभाग घेतला.
--
फोटो क्रमांक : ०६ कुरुळी रक्तदान शिबिर
फोटोओळ : निघोजे ता.खेड येथे रक्तदान शिबिराचा शुभारंभ करताना आमदार दिलीप मोहिते पाटील .