सरपंच विशाल बारावकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारावकर यांच्या पुढाकारातून केवळ दोन दिवसांच्या आयोजनमध्ये एका छोट्या गावात तब्बल १०० बॅगा रक्तसंकलन करण्यात आले. तर १० अँटिबॉडीज तपासण्यात आल्या आहेत.
या वेळी देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारावकर यांनी देखील रक्तदात्यांचे व कोरोना योद्धा यांचे मनोबल वाढवण्यासाठी १०० बॉटल हँड सॅनिटायझर दिले व ग्रामपंचायतला ३५ लिटर सोडियम हापोक्लोराईड फवारणीसाठी मोफत दिले आहे.
या वेळी रक्तदान व अँटिबॉडीज प्लाझ्मा दान करणाऱ्यांना १ लाख रुपये किमतीचे अपघात विमाकवच मोफत मिळणार असल्याचे देऊळगावगाडा ग्रामविकास फाउंडेशनच्यावतीने सांगण्यात आले. तसेच गावामध्ये कोरोना प्रतिबंधक दोन वेळा लसीकरण मोहीम राबविण्यात आले आहे.
या प्रसंगी सरपंच विशाल बारावकर, उपसरपंच गणेश जाधव, अक्षय बारावकर, डी. डी. बारावकर, तुषार शितोळे तसेच ग्रामविकास फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
--
चौकट :
रक्तदान हेच श्रेष्ठदान
कोरोनाच्या महामारीत भारताचे नागरिक म्हणून आपण आपले योगदान दिले पाहिजे. गेल्यावर्षी आपल्या अनेक कोरोना योध्द्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून रक्तदान केले होते. यावर्षीही सरकारच्या आवाहनानुसार रक्ताची अत्यंत गरज असल्याने आपण रक्तदान केल्याने कोणाचे जीव वाचणार असेल तर आताही आपण नक्कीच रक्तदान करू यात. आणि दौंड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ही रक्तदान मोहीम यशस्वीपणे राबविणे गरजेचे आहे
- विशाल बारावकर, सरपंच, देऊळगावगाडा
--
फोटो क्रमांक : ०३ खोर रक्तदान शिबीर
फोटोओळ : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे आयोजित रक्तदान शिबिर.