या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ८१ बॅगा रक्त संकलन करण्यात आले असल्याची माहिती शशांक फाउंडेशनचे संचालक विकास चौधरी यांनी सांगितले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास १ वर्षासाठी अडीच लाखाचा विमा मोफत करण्यात येणार आहे. तसेच रक्तदात्यास व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आयुष्यभर रक्ताची गरज भासल्यास मोफत मिळणार आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते डी. डी. बारावकर यांच्या वतीने मोफत सॅनिटायजर बाटल्या देण्यात आल्या आहेत. श्यामराव गायकवाड यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पुणे ब्लड बँकेचे डॉ सीताराम दस, उपसरपंच पोपट चौधरी, सुभाष चौधरी, शिवाजी पिसे, गणेश साळुंके, दिलीप डोंबे, विकास चौधरी, राहुल चौधरी, भाऊसाहेब कुदळे, दिलीप डोंबे, मारुती फरतडे उपस्थित होते.