या संदर्भात अधिक माहिती देताना प्रशांत काळभोर पुढे म्हणाले सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध रक्तपेढ्यांमध्ये व रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. मात्र रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार ( १४ एप्रिल ) रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत येथील आठवडा बाजाराच्या जागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आगाऊ नावनोंदणी करुन रक्तदान करावे व प्लाज्मादान प्रतिक्षा यादीत आपले नाव नोंदवावे असे आवाहन प्रशांत काळभोर यांनी केले आहे.