कोरोनाचे सर्व नियम पाळून श्रीक्षेत्र महाळुंगे गावातील सभामंडपात रक्तदान शिबिर घेण्यात आले. युवकांनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद देत असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. शंभूराजे मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच विशाल भोसले, युवा उद्योजक विद्याधर तुपे इत्यादींनीसुध्दा रक्तदान केले.
महाळुंगे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक यमगर, हवालदार शिंदे, पोलीस पाटील सचिन भोपे, ग्रामपंचायत सदस्य नितीन फलके, मनोज इंगवले उपस्थित होते.
यशस्वी करण्यासाठी विशाल पवार, अतुल भोसले, संदेश म्हाळुंकर, अजिंक्य म्हाळुंकर यांनी विशेष योगदान दिले. तसेच कैवल्य जाधव, सुशांत भोईर, प्रतीक तुपे, सम्राट तुपे, अतुल जावळे, प्रतीक पवार, रोशन तुपे, पुनित पवार, देवेंद्र मिंडे, अभिषेक जावळे, प्रथमेश जाधव, संदीप म्हाळुंकर, अनिकेत गायकवाड, अनिकेत वाळुंज, कृष्णा भोसले, रोहित तुपे, सूरज वाळके, अक्षय बोऱ्हाडे, प्रथमेश म्हाळुंकर यांनी परिश्रम घेतले.