मांडवगण फराटा येथे १०७ जणांनी, तर सादलगाव येथे २७ जणांनी बाभूळसर बुद्रुक येथे ७० बॅग रक्त संकलित करण्यात आले असे एकूण २०४ नागरिकांनी रक्तदान केले. तसेच या रक्तदान शिबिरामध्ये अनेक प्लाझ्मा दात्याची तपासणी करून गरजेनुसार त्यांचा प्लाइमा घेण्यात येणार आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. शिबिरात प्रवेश करण्यापूर्वी इच्छुकांना प्रथम सॅनिटायझर व मास्क देण्यात येत होते. ज्या व्यक्तीने रक्तदान केले आहे अशा नागरिकांना रक्तदान प्रमाणपत्र ही देण्यात आले. रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तरुणवर्गाकडून मिळत होता. रक्तदान करण्यासाठी महिलादेखील पुढे आल्या होत्या. मांडवगण फराटा येथील राजेंद्र बोत्रे व ज्योती बोत्रे हे पती-पत्नी, तर बाभूळसर बुद्रुक येथील उपसरपंच दीपाली नागवडे व महेंद्र नागवडे या पती-पत्नीने रक्तदान केले.
--