येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने दिली.
सध्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब विचारात घेऊन,यंदाचा जयंती महोत्सव विधायक स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र अडचणीत असताना आम्ही आमचं रक्त या देशासाठी या राज्यासाठी देऊन "रक्तदान करूनी..... महामानवांना अभिवादन करूया...." या अभियानांतर्गत हे महारक्तदान शिबिर आयोजित केल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बारामती येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महारक्तदान शिबिर पार पडले.
फोटो मेलवर पाठवला आहे.