शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते-पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी केईएम हॉस्पिटल व पूना हॉस्पिटलचे कन्सल्टंट डॉ. कल्याण गंगवाल, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते, पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी, महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, शुभांगी कम्युनिकेशनचे संचालक पप्पूशेठ भळगट, जय हरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गव्हाणे आदींच्या हस्ते होणार आहे.
'रक्तदान म्हणजे जीवदान' या भूमिकेतून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 'रक्तदान' करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भानुदास पऱ्हाड (९७६३७७२८४४ / ९७६६१४१४४१), संतोष गव्हाणे (९०४९ ७७९७९७) यांच्याशी संपर्क साधावा.