मंचर (ता. आंबेगाव) येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जॅक मेडिको हेल्थ केअरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १६० रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सतीश होडगर, मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले, आंबेगाव तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अतुल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाराणा प्रताप अकॅडमीचे गणेश शिंदे, पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्टचे सदस्य संदीप कोरडे, जॅक मेडिकोचे प्रकाश बांगर, मुकुंद काळे, सचिन काळे, बाबूशेठ कुऱ्हाडे, प्रदीप घुमटकर, संतोष चोरडिया, अमित जाधव, मंगेश वाघ, विक्रम करंजखेले आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरादरम्यान मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंतराष्ट्रीय व्यवसाय मार्गदर्शक दिलीप औटी, दौंड केमिस्ट असो. राहुल वागसकर, नीलेश जगदाळे आदी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक रमेश शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश भूमकर यांनी केले, तर आभार भगवान हांडे यांनी मानले.
फोटोखाली: जॅक मेडिको हेल्थकेअरच्या वतीने मंचर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.