शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेअंतर्गत बारामतीत रक्तदान महायज्ञास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:08 AM

६३ जणांनी केले रक्तदान ६३ जणांनी केले रक्तदान : बारामती : ‘लोकमत’चे संपादक, संस्थापक श्रद्धेय ...

६३ जणांनी केले रक्तदान

६३ जणांनी केले रक्तदान :

बारामती : ‘लोकमत’चे संपादक, संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवारी (दि ३) ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन यावेळी ६३ जणांनी रक्तदान केले.

लोकमत आणि कार्य हीच ओळख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांच्या सहकार्याने बारामती येथे हे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भारत शिंदे, तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, तिरंगा कॉलेज ऑफ अ‍ॅनिमेशनचे चेअरमन रणजित शिंदे, राज्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तुषार झेंडे यांच्या हस्ते लोकमतचे संपादक संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ब्लड बँकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. धवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. सिसोदिया, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, माळेगांव कारखान्याचे संचालक स्वप्नील जगताप यांनी यावेळी शिबीराला भेट देत माहिती घेतली.

यावेळी दीपप्रज्वलन केल्यानंतर शिबिराला सुरवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रक्तदान मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो, या लोकमतने केलेल्या आवाहनाला बारामतीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी लोकमत बारामती कार्यालयाचे प्रशांत ननवरे, सोमनाथ धुमाळ, रविकिरण सासवडे यांच्यासह आणि कार्य हीच ओळख फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांनी परिश्रम घेतले. लोकमत आणि कार्य हीच ओळख फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला चिंचेचे रोपटे देण्यात आले.

—————————————————

...वडीलांच्या रक्तदानाची परंपरा जपण्यासाठी ‘ती’ने केले रक्तदान

बारामती येथे लोकमत च्यावतीने आयोजित ईश्वरी अरविंद भागवत या युवतीने केलेले रक्तदान कौतुकाचा विषय ठरले. ईश्वरी ही तिच्या आईसमवेत रक्तदानासाठी आली होती. तिचे वडील अरविंद भागवत यांना सामाजिक कार्याची आवड होती. ते नेहमी रक्तदान करीत असत. मात्र, २०१८ मध्ये भागवत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र,स्वरा हिने आज लोकमतच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान करीत वडिलांची परंपरा जपली. त्याचबरोबर मकरंद जोशी आणि सुप्रिया जोशी, अ‍ॅड. आनंद थोरात आणि उज्वला थोरात, अमोल दोशी आणि प्रणिता दोशी हे दाम्पत्य रक्तदान करण्यासाठी पोहचले. मात्र, रक्तदान पूर्व तपासणीत या तिन्ही महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्यानंतर तिघींना रक्तदान करण्यास मनाई करण्यात आली.

—————————————————

रक्तदात्यांची नावे

लोकमतचे बारामती शहरातील प्रमुख विक्रेते संतराम घुमटकर, लोकमत बारामती कार्यालयाचे रविकिरण सासवडे, वार्ताहर तात्यासाहेब घाटे, किशोर भोईटे, पत्रकार अमोल यादव, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, भाजप कार्यकारीणी सदस्य गोविंद देवकाते, डॉ.प्रसाद कुलकर्णी, कारगिल जवान राहुल भोईटे, गौरव आपुणे, दिपक चव्हाण, स्वप्नील आपुने, संग्राम खराडे, सुहास आटोळे, प्रतीक भिंगारे, अभि थोरात, ऋषिकेश माने, सचिन वाकळे, बजरंग कुंभार, संतोष मदने, राजेश साळुंखे, सागर खरात, तुळजाराम बोराडे, योगेश एखंडे, गणेश मिसाळ, निखिल भदाने, नागेश नांगरे, भोसले प्रतिक, विकास माळशिकारे, अभिजीत लोंढे, हनुमंत लोणकर, अमीर शेख, रज्जाक शेख, राजेश जोशी, ओंकार माने, नवनाथ गिरे, किशोर पवार, वैभव धुमाळ, दिनेश गायकवाड, प्रशांत बनकर, , संभाजी जाधव, कपिल बोरावके, आसूद बागवान, मकरंद जोशी, अल्ताफ शेख, अक्षय शिंदे, दत्तात्रेय कोळेकर, अजित परकाळे, निखिल भोसले, ज्योतीराम आवटे, गणेश ढमे, दत्ता लोंढे, स्वप्नील निकम, नितिन वाघ, कौस्तुभ टंकसाळे, संदिप मुळे, अमोल अशोक यादव, योगेश काटे, सुजयसिंह कांबळे.

फोटो ओळी :‘लोकमत’चे संपादक, संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, दीपप्रज्वलाने बारामती येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित राजेंद्र केसकर, नामदेव शिंदे, प्राचार्य डॉ भारत शिंदे, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, रणजित शिंदे, तुषार झेंडे.

०३०७२०२१-बारामती-०१

————————————————

‘लोकमत’चे संपादक, संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे आयोजित रक्तदान शिबीरात उपस्थित राजेंद्र केसकर, नामदेव शिंदे, प्राचार्य डॉ भारत शिंदे, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर, रणजित शिंदे, तुषार झेंडे.

०३०७२०२१-बारामती-०२

———————————

‘लोकमत’चे संपादक, संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथे आयोजित रक्तदान शिबीरात स्वरा भागवत या युवतीने रक्तदान केले.

०३०७२०२१-बारामती-०३

०३०७२०२१-बारामती-०४

——————————————