रक्तदात्यांनाही अपघाती विम्याचे दोन लाख रुपयांचे विमा कवच व प्रत्येकाला वाफेचे मशीन देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्त संकलनासाठी पुणे येथील अक्षय ब्लड बँकेने सहकार्य केले. तसेच त्यांनी ८७ जणांची मोफत अँटीबाँडीज तपासणी करण्यात आली . २६४ रक्त बाटल्या संकलित झाल्या आहेत. शिबिरास ओतूरच्या सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डुंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, विविध संस्थेचे पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत भेटी दिल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसह्याद्री युवा मंचचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यात श्रीकांत पंडोरे, यश पन्हाळे, नीलेश येवले, सिद्धेश डुंबरे, प्रणय बोडके यांनी उत्तम व्यवस्थापन केले.