पुणे : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याद शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीनिमित्त राज्य राखीव पोलिस बलाच्या (एसआरपीएफ) पुणे व दौंड येथील १८९ जवानांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ससून रुग्णालयातील रक्तपेढीने त्यासाठी सहकार्य केले. कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. समादेशक तानाजी चिखले यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन झाले. रक्तपेढीच्या वतीने डॉ. शंकर मुगावे यांच्या समन्वयातून दौंड आणि हडपसर येथे शिबिर झाले. यावेळी दौंडचे सहायक समादेशक सुभाष धुमाळ व चंद्रकांत शारबिद्रे, पोलीस निरीक्षक पद्माकर पारखे, सचिन डहाळे उपस्थिथ होते.
एसआरपीएफ जवानांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 4:11 AM