पुणे : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे आणि दसरा दिवाळीच्या दरम्यान रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे ‘प्लेटलेट’ या रक्तघटकाचा शहरातील रक्तपेधंमध्ये प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील माेठमाेठया हाॅस्पिटलमधील रक्तपेढयांमध्येही प्लेटलेट मिळत नसल्याने पेशंटना ‘प्लेटलेट साठी दाही दिशा’ फिरण्याची वेळ आली आहे.
दसरा दिवाळीच्या दरम्यान रक्तदान शिबिरांची संख्या कमी हाेते. तसेच सध्या शहरात डेंग्यू रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. डेंग्यू ची लागण झालेल्यारुग्णंमध्ये ‘प्लेटलेट’ झपाटयाने खाली येतात. प्लेटलेट या शरीरातील रक्त गाेठवण्याचे काम करत असतात. त्यांची संख्या शरीरात ३ ते साडेतीन लाख इतकी असते. परंतू, डेंग्यूची लागन झालेल्या रुग्णांमध्ये ती लाखाच्या आतच येते. ही संख्या ५० हजारांच्या आत आल्यास रुग्णाला वरून प्लेटलेट दयाव्या लागतात. परंतू, सध्या ताेच घटक मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण हाेत आहे.
शहरातील ससून रुग्णालय, नाेबल हाॅस्पिटल, वायसीएम रुग्णालय, पुना हाॅस्पिटल, जेहांगिर हाॅस्पिटल, नवले हाॅस्पिटल येथील रक्तपेढयांना काॅल केले असता त्यांनी प्लेटलेट नसल्याचे सांगितले. तसेच आधार ब्लड बॅंक, आयएसआय ब्लड बॅंक येथेही प्लेटलेट नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेकडे असलेल्या आकडेवारीनुसार शहरात ऑक्टाेबर महिन्यात ३७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. परंतू, प्रत्यक्षात ही संख्या खूप माेठी आहे. प्रत्येक हाॅस्पिटलमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या प्रचंड आहे.
प्लेटलेट गाेळा करण्याचे दाेन प्रकार आहेत. एक म्हणजे ‘आरडीपी डाेनर’ म्हणजेच रक्तदान केलेल्या रुग्णांच्या रक्तातून त्या वेगळया केल्या जातात. परंतू, त्यांची संख्या कमी असते. तर केवळ प्लेटलेट दान करण्या-या दात्यांना ‘एसडीपी’ डाेनर असे म्हणतात. त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात प्लेटलेट असतात. परंतू, या प्लेटलेट रक्तपेढीत काढल्यानंतर त्याचे आयुष्य पाचच दिवस असते. त्यामुळे त्यांचा साठाही करून ठेवता येत नाही. म्हणून देखील त्याचा तुटवडा जाणवताे.
सध्या डेग्यू रुग्णांमुळे प्लेटलेटची मागणी वाढली असली तरी आमच्याकडे शिबिर घेत असल्याने प्लेटलेटची मागणी पुर्ण करत आहाेत. एसडीपी मुळे मध्ये एकाच डाेनरकडून माेठया प्रमाणात प्लेटलेट मिळतात. तर, आरडीपी मध्ये चार ते आठ डाेनरच्या प्लेटलेट एकाच पेशंटला देण्याची गरज भासते. - डाॅ. पूर्णिमा राव, वरिष्ठ सल्लागार, सहयाद्री हाॅस्पिटल
मी दहा ब्लड बॅंकांकडे चाैकशी केली परंतू, काेठे प्लेटलेट मिळालले नाहीत. एका पेशंटला तर थेट लाेणी काळभाेरहून प्लेटलेट आणल्या. डेंग्यू पेशंटची संख्या वाढली आहे. हा तुटवडा आठ दिवसांपासून आहे. रक्तातुन काढलूल्या प्लेटलेट एका माणसाला ४ लागतात. दिवाळीच्या सिझनमुळे कॅंपही नसल्याने हा तुटवडा झाला असून रक्तदानासाठी अधिकाधिक नागरिकांनी समाेर यावे. - राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट