पुणे : सध्याच्या कोरोनाच्या संकटात आपात्कालीन परिस्थितीत कधीही रक्ताचा तुटवडा भासू शकतो, याची खबरदारी म्हणून पुणे परिसरात या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेणे गरजेचे असल्याचे मत इंडियन ह्युमन राइट्स असोसिएशनचे संस्थापक कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केले.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत होते. यासाठी रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने बेलठिका नगर, थेरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रितेश भुजबळ यांनी केले होते. त्यावेळी गायकवाड बोलत होते. शिबिराचे उद्घाटन समाजसेवक रवी भिलारे व अजिंक्य बारणे यांनी केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. आर. गायकवाड, साहिल गायकवाड, शोभा गायकवाड, आदित्य सोनवणे, सकलेन शेख आदी उपस्थित होते. एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.