शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना शेडे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शासकीय अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ८२ शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. पुण्यातील रक्तपेढीने रक्तसंकलन केले. या रक्तदान शिबिरास शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार, पाणीपुरवठा समिती सभापती मुजफ्फर कुरेशी, स्वच्छता समितीचे सभापती विठ्ठल पवार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रभुलिंग वळसंगे, नगरसेवक मंगेश खांडरे, सचिन धाडीवाल, मनसेचे महिबुब सय्यद, संदीप कडेकर, वाहतूक सेनेचे अनिल बांडे, नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, मुख्य लिपिक अयूब सय्यद आदींनी या शिबिरात सहभाग नोंदविला.
शिरूरला ५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:11 AM