पुणे : बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) पर्यावरणपूरक परिसर हाेण्याकडे एक पाऊल टाकले अाहे. महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण हाेत असल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचा परिसर पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात अाला अाहे. याची सुरुवात म्हणून महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात बायाेगॅस प्रकल्प सुरु करण्यात अाला असून या प्रकल्पाचे उद्घाटन अाज उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. विजय नारखेडे अाणि डेक्कन एज्युकेशन साेसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी डेक्कन एज्युकेशन साेसायटी नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम, के.पी.अाय.टी ग्रुपचे चेअरमन रवि पंडित, महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ उपस्थित हाेते. बायाेगॅस प्रकल्प सुरु करणारे बीएमसीसी हे पहिले महाविद्यालय ठरले अाहे.
महाविद्यालयातील विविध प्रर्यावरणपूरक प्रकल्प ज्येष्ठ उद्याेजक नितीन देशपांडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत अाहेत. महाविद्यालयात सध्या प्रतिदिन 22.5 किलाे अन्न कचरा जिरवण्याची क्षमता असलेले बायाेगॅस यंत्र बसवले अाहे. त्यामुळे वसतीगृहातील उरलेलं अन्न, अाेला कचरा, झाडाचा पाेचाेळा यांचा वापर करुन मिथेन वायू निर्माण करण्यात येणार अाहे. त्यामुळे वर्षाचे 19 किलाेचे 22 सिलेंडर इतके इंधन निर्माण हाेणार अाहे. या यंत्रामध्ये 3000 लिटर क्षमतेचा डायजेस्टर व 3000 लिटर गॅस साठवणक करणारा फुगा वापरण्यात अाले अाहे. हे यंत्र वापरताना वीजेचाही वार करावा लागत नाही. त्याचबराेबर कचराही जसाच्या तसा बारीक न करता टाकला तरी चालताे. त्यातून जैविक खत निर्माण हाेणार असून त्याचा वापर महाविद्यालयाच्या बागेसाठी करता येणार अाहे. वायु असे या यंत्राचे नाव असून वाया नाही वायु हे याचे ब्रीदवाक्य अाहे.
महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पसबाबत अधिक माहिती देताना नितीन देशपांडे म्हणाले, महाविद्यालयात रेन वाॅटर हार्विस्टिंगद्वारे टेकडीवरुन येणारे पाणी साठविण्यात येईल. या माध्यमातून महाविद्यालयातील बाेअरवेल्स रिचार्ज करुन भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यावर भर देण्यात येणार अाहे. त्याचबराेबर महाविदयालयांच्या इमारतींवर साेलार पॅनलही बसविण्यात येणार अाहेत. अंघाेळीचे पाणी ज्यास पर्यावरणीय भाषेत ग्रे वाॅटर म्हणतात त्याच्यावर प्रक्रिया करुन ते फ्लशींगसाठी वापरण्यात येणार अाहे. या विविध प्रकल्पांच्या अाधारे महाविद्यालयाला वीज, गॅस, पाणी यांसाठी दर वर्षाला येणारे 51 लाखांचा खर्च खून्यावर अाणण्याचा प्रयत्न करण्यात येणार अाहे.