निरवांगी : निमसाखर (ता. इंदापूर) येथे नीरा नदी इंदापूर व माळशिरस तालुक्याच्या हद्दीतून पुढे क्षेत्र नीरा-नृसिंहपूर व पंढरपूरकडे जाते. निमसाखर येथे नदीच्या पात्रात नागरिक व विद्यार्थी यांना ये-जा करण्यासाठी पूल नाही. त्यामुळे येथील नागरिक व विद्यार्थ्यांना होडीचा आधार घेऊनच ये-जा करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची अनेक दिवसांपासून पात्रात पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे. आज शाळेचा पहिलाच दिवस व आजच पाणी असल्याने होडी बंदच होती. यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना निमसाखर, कळंब, बारामती या ठिकाणी शाळेसाठी येता आले नाही.निमसाखर गावाजवळच बांगडै (ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे गाव आहे. बांगडै व परिसरातील वाड्यावस्तीवरील विद्यार्थी हे निमसाखर, कळंब व बारामती या ठिकाणी येत असतात. साधरणत: जून ते डिसेंबर या महिन्यात नदीच्या पात्रात पाणी असते. पाणी असल्यानंतर येथील विद्यार्थी होडीचा आधार घेत निमसाखरला येत असतात.परंतु, होडी अनेकवेळा ना दुरुस्त असल्याने बंद असतात. यामुळे येथील विद्यार्थ्यांना निमसाखर या ठिकाणी येता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक वेळा शैक्षणिक नुकसान होत असते.आज शाळेचा पहिला दिवस व आजच नीरा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीचे दरपे काठली आहेत. यामुळे निमसाखर या ठिकाणच्या पात्रातत पाणी आले होते. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत होडी सोडली जात नाही. तसेच होडी व्यवस्थित असणे गरजेचे असल्याने होडी दुरुस्तीस वेळ ही लागत असतो. ज्या वेळेस होडीची गरज आहे त्या वेळेस होडी मिळेलच असे नाही.बांगडै व निमसाखर (ता. इंदापूर) येथील विद्यार्थी, शेतकरी, व नागरिकांची अनेक दिवसांपासून पात्रात पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्षहोत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व नागरिकांनाही ये-जा करीत करण्यासाठी संबंधित खात्याने या ठिकाणी पाहणी करून पूल बांधवा, अशी मागणी होत आहे.
होडी बंद असल्याने शाळेला दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 12:38 AM