वानवडी : बी. टी. कवडे रोडवरील कँनलच्या बाजुने जाणाऱ्या रस्त्यावरील शाळकरी मुले व नागरिकांनी कँनलमधून महिला वाहत चाललेली पाहून प्रत्यक्षदर्शीने पाण्यात उडी घेऊन महिलेला बाहेर काढले त्यानंतर भैरोबानाला पोलीस चौकी मध्ये माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास राऊत यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन महिलेचे शव ताब्यात घेऊन उपचारासाठी ससुन रुग्णालयात मध्ये पाठवण्यात आले, परंतु तीचा आधीच मृत्यू झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी हा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत महिलेची ओळख पटलेली नसल्याने महिलेची हरवल्याची तक्रार कोठे नोंदवली आहे का यावरून शोध सुरु केला आहे. महिलेचे वय साधारण ३० वर्षे असण्याची शक्यता असुन उंची अंदाजे ५ फुट व नेसणीस लाल रंगाचा ब्लाउज, गुलाबी रंगाचा परकर, गळ्यात काळे रंगाची पोत, काणात कर्णफुले, नाकात चमकी व डाव्या हातात हिरव्या बांगड्या आहेत. या केसचा तपास भैरोबानाला पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास राऊत करत आहेत.