पुणे : मुळा-मुठा नदीपात्रातील पुना हॉस्पीटल भागात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना समोर आली असून मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नदीपात्रात टाकून दिल्याचे दिसून येत आहे. महिलेचे वय ३० ते ३५ वर्ष असून तिच्या शरीरावर वार करण्यात आले होते. महिलेचा मृतदेह कुजलेला असल्याने तो काही दिवसांपुर्वीच नदीत टाकण्यात आला असावा. त्यामुळे तिची ओळख पटविणे अवघड जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानांनी स्थानिक जीवरक्षक राजेश काची, संजय जाधव यांनी त्यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. महिलेचे हात पाय मागील बाजूस बांधलेले असलेल्या अवस्थेत मृतदेह पोत्यामध्ये आढळून आला. दरम्यान, नदीपात्रात मृतदेह आढळल्याचे समजताच घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. महिलेने नीळसर कुर्ता आणि चॉकलेटी रंगाची लेगिन परिधान केलेली आहे. हातात घड्याळ तसेच पायात सँडलही आहेत. तीच्या डाव्या हातावर संजय असे मराठीत गोंदलेले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी पोलिसांनी दिली. .........................मारेकऱ्यांच्या शोधासाठी तीन पथके रवानामयत महिलेची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग महिला युवतींची माहिती पडताळून पाहिली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत. अजय कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस स्टेशन
मुळा-मुठा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:19 PM
पुना हॉस्पीटल भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह हात पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
ठळक मुद्देशरीरावर वार असल्याने हा खूनाचा प्रकार असण्याची शक्यता