कोरेगाव भीमा - शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, धामारी, करंदीसह जातेगाव बुद्रुक येथील ४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातच अनेक ठिकाणी या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बोगस डॉक्टरांचे दवाखाने राजरोसपणे सुरू असल्याने त्यांना अभय कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या डॉक्टरांवर कार्यवाही करणाºया तालुका वैद्यकीय अधिकाºयांवर स्थानिक पुढाºयांचा दबाव असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास अडथळे येत असल्याचेही बोलले जात आहे.शिक्रापूर (ता. शिरूर) येथे कार्यरत असणारा बोगस डॉक्टर उत्पल अरविंद विश्वास यांच्यावर कारवाई करण्याबाबत उपसरपंच आबाराजे मांढरे यांनी तक्रार केल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तत्काळ दखल घेत बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी माने यांच्याशी संपर्क साधत नागरिकांच्या जिवाशी खेळणाºया जिल्ह्यातील सर्वच बोगस डॉक्टरांवर कारवाईच्या सूचना केल्या होत्या. यानंतर जिल्हा वैद्यकीय अधिकारी माने यांनी २० जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तालुका वैद्यकीय अधिकाºयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मायादेवी पवार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार केंदूर आरोग्य केंद्राच्या हद्दीतील बोगस डॉक्टरांची तपासणी करून कारवाईच्या सूचना आरोग्य अधिकारी यांनी २० जानेवारी रोजी दिल्या होत्या. त्यांनतर शनिवारी केंदूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मायादेवी पवार, डॉ. राजेश कटिमन्नी, आरोग्य सेवक अशोक गायकवाड, आरोग्यसेवक श्रीकृष्ण नेवरे, अनिल महानुभाव, शरद पºहाड यांच्या पथकाने केंदूर आरोग्य केंद्राच्या हद्दीतील बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर धामारी येथे एका संशयित हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली असता तेथेही बोगस डॉक्टर्स आढळून आले. त्यांच्याकडे प्रमाणपत्रांची चौकशी केली असता ते बोगस असल्याचे आढळले. त्यांनतर पथकाने करंदी येथे एका हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. त्याठिकाणीही बोगस डॉक्टर्स आढळून आले. त्यांच्याकडील प्रमाणपत्रेही बोगस असल्याचे आढळले. यांनतर या पथकाने त्यांचा मोर्चा जातेगाव बुद्रुक येथील बोगस डॉक्टरांकडे वळवत या तीनही ठिकाणी बोगस डॉक्टरांविरोधात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात भादंवि कलम ४२० तसेच महाराष्ट्र मेडिकल कायदा कलम ३३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.बोगस डॉक्टरांना पुढाºयांचेच अभयतालुक्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरू केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले. मात्र, बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करताना स्थानिक पुढाºयांचाच दबाव येत असल्याचे त्यांनी सांगितल्याने सर्व बोगस डॉक्टरांना पुढाºयांचेचअभय असल्यानेच तालुक्यात अजुनही बोगस डॉक्टर्स राजरोसपणे आपला कारभार करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.जिल्ह्यातील सर्वचबोगस डॉक्टरांवर कारवाई कराशिक्रापूर व परिसरात राजरोसपणे बेकायदेशीर दवाखाने बोगस डॉक्टर चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी तत्काळ जिल्ह्यातील सर्वच बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे मागणी केली असता मांढरे यांनी जिल्ह्यातील सर्वच बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्याचे आश्वासन दिले.- कुसुम मांढरे,जिल्हा परिषद सदस्याकारवाई होणार का?शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस, दौंड तालुक्यातील पाठेठाण, दहिटणे, वाळकी येथे बोगस डॉक्टर्स गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात वैद्यकीय अधिकारीही धजवत नसल्याने या बोगस डॉक्टरांना नेमके अभय कोणाचे आहे, असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
पुणे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, चौघांवर गुन्हे, अनेक जण अद्यापही मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 2:44 AM