पुणे : बोगस प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देणाऱ्या वारजे येथील पीयूसी सेंटरचे मशिन तसेच चालकाकडील सर्व प्रमाणपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्त केली आहेत. संबंधित सेंटर चालकाला आरटीओने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर चालकाविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग यांनी दिली.आरटीओ आवारातील एका एजंटमार्फत वाहनाची तपासणी न करता बोगस पीयूसी दिले जात असल्याचा प्रकार लोकमतने उजेडात आणला होता. याबाबत आरटीओ जितेंंद्र पाटील यांच्याकडे बोगस पीयूसी मिळालेल्या एका तरुणाने लेखी तक्रार केली होती. त्यानुसार कार्यालयाने वारजे येथील या सेंटरची तपासणी केली. तसेच, त्याच्याकडील पीयूसी मशीन व कोरी प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहे. मात्र, हे सेंटर संबंधित एंजटाचे नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे तो एजंट व पीयूसी चालकाचे साटेलोटे असण्याची शक्यता आहे. एजंटमार्फत आणखी बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बोगस पीयूसी देणा-या सेंटरचे मशिन जप्त
By admin | Published: February 26, 2015 3:20 AM