पुणे : कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे दिवसा उकाडा तररात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़राज्यातील सर्व प्रमुख शहरांतील दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ त्या तुलनेत रात्रीच्या किमान तापमानात ही वाढ १ ते २ अंश सेल्सिअस इतकीच आहे़ त्यामुळे दिवसा उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३६़२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़पुण्यात सोमवारी कमाल तापमान ३३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, ते सरासरीच्या तुलनेत २़२ अंश सेल्सिअसने जास्त होते़ तर, किमान तापमान १३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ दिवसा घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर एका ठिकाणी थांबले, तरीअंगाला चटका जाणवतो़ सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होत असल्याने रात्री गारवा जाणवत आहे़पुढील तीन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ २३ फेबु्रवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़प्रमुख शहरांमधील किमान तापमानपुणे १३़८जळगाव १२़६कोल्हापूर १९़१महाबळेश्वर १६़४मालेगाव १३़६नाशिक १२़४सांगली १७़३सातारा १५़१सोलापूर १९़१मुंबई २१़५सांताक्रुझ १७़४अलिबाग १९़५रत्नागिरी १९़६पणजी २१़४डहाणू १७़८भिरा १७औरंगाबाद ११़५परभणी १६नांदेड १६अकोला १६़३अमरावती १९़२बुलढाणा १७़२ब्रम्हपुरी १३़४चंद्रपूर १९गोंदिया १३़८नागपूर १४़६वर्धा १६़५यवतमाळ १७़४
दिवसा उकाडा तर रात्री गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:17 AM