शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बॉम्बच्या अफवेने कल्याणीनगरमध्ये घबराट

By admin | Published: June 02, 2017 2:36 AM

कल्याणीनगर परिसरात अनोळखी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र

लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : कल्याणीनगर परिसरात अनोळखी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बॉम्ब पथकाने याची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये व्यक्तीचे कपडे असल्याचे नागरिकांना समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.उच्चभ्रू जनतेची वसाहत म्हणून कल्याणीनगर भागाची ओळख असून या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी दुकाने व्यवसाय उभारल्याने नेहमीच परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. गुरुवारी (दि. १ ) कल्याणीनगर परिसरातील एका हॉटेलात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. त्यातच हॉटेलमधील एका टेबलावर एक बेवारस बॅग (पिशवी) हॉटेल मॅनेजरला दिसून आली. कोणी अज्ञात व्यक्तीने या बेवारस पिशवीमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरताच सर्व ग्राहक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल ाालकाने तत्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधल्यावर येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कदम, सहायक फौजदार मोहन ढगारे, हरीश मोरे, अजित मगदूम, विनायक साळवे, शिवाजी धांडे, शरद घोरपडे, नागेश शिंगकुवर हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर काही अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने पोलिसांनी असलेली बॅग (पिशवी) शांत जागेत ठेवून त्यानंतर कदम यांनी श्वानपथक व बॉम्बपथकास याची माहिती दिली. श्वान व बॉम्बशोध पथक तत्काळ घटनेच्या ठिकाणी हजर होऊन पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये अज्ञात व्यक्तीचे कपडे आढळून आल्यानंतर सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या वेळी परिसरात एकच गर्दी जमली होती. यापूर्वीदेखील कल्याणीनगरलगत असणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती. अनेक निष्पाप जीवांना जीव गमविण्याची वेळ आली होती. त्याप्रसंगाची जर्मन बेकरीपासून नजीकच असलेल्या कल्याणीनगरमधील संबंधित हॉटेलमधील तथाकथित बॉम्ब प्रकरणाची आठवण उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.याबरोबरच अशा गंभीर स्वरूपाच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस पथकासह महत्त्वाच्या ठिकाणांची आठवडाभरापूर्वीच पाहणी करून असणाऱ्या त्रुटींची माहिती हॉटेल व्यावसायिकांना दिली होती. यानंतर ही बॅग (पिशवी) हॉटेलमध्ये आलेला एक ग्राहक विसरून गेल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याची बॅग (पिशवी) त्याच्या ताब्यात दिली.