पुणे : तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ .सायबर पोलिसांनी या तरुणाचा छडा लावून त्याला अटक केली आहे़.प्रविण हिराचंद कुंभार (वय ३१, रा़ पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़.
पोलिसांनी सांगितले की, प्रविण कुंभार हा मुळचा बारामती तालुक्यातील असून त्याने एम एस्सी फिजिक्स केले आहे़ .त्यानंतर त्याने अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली़ पण कोठेच तो टिकू शकला नाही़. गेल्या काही दिवसांपासून त्याला नोकरी नव्हती़. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता़. त्याला एक बंद पडलेला मोबाईल सापडला़ त्याने तो दुरुस्त करुन घेतला़. वडिलांकडून पैसे घेऊन तो गोव्याला गेला होता़. त्यानंतर त्याने मोबाईलवर बनावट ई मेल खाते तयार केले़, त्यावरुन त्याने प्रथम ३१ जानेवारी व त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी नोबेल हॉस्पिटलला ई मेल करुन १० लाख रुपयांची मागणी केली़ पैसे दिले नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली़. या ई मेलने एकच खळबळ उडाली होती़. पोलिसांनी संपूर्ण हॉस्पिटलची तपासणी केली़ त्यात काहीही आढळून आले नाही़.या गुन्ह्यातील ई मेलचे तांत्रिक विश्लेषण सायबर पोलिसांनी केल्यावर तो गोव्याहून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले़. त्यानंतर प्रविणला वाई येथून ताब्यात घेण्यात आले़. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे़. त्याला अधिक तपासासाठी हडपसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, शिरीष गावडे, प्रवीणसिंग राजपूत, संतोष जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.असुरक्षित वाय फाय कनेक्शन वापरअनेक जण वाय फाय कनेक्शन घेतात़ त्याचा पासवर्ड सिक्युअर्ड नसतो़ प्रविण याने गोव्यातून इंटरनेटची सातस्तरीय सुरक्षा भेदून बनावट मेल आयडी तयार केला़ त्याने महाराष्ट्र व गोव्यात फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे विना पासवर्ड वाय फाय व हॉट स्पॉटचा शोध घेऊन त्याचा वापर केला होता़ त्यामुळे प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी सायबर पोलिसांना संबंधित कंपनीकडून तातडीने माहिती प्राप्त करुन घेण्यात अनेक अडचणी आल्या.