सिंहगड रस्ता : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुकजवळ, हॉटेल विश्वाससमोर आज सकाळी दुधाची वाहतूक करणारा टॅँकर टायर फुटून उलटला. यात अपघातग्रस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले व दूधही सांडून वाया गेले.शनिवारी सकाळी साडेअकराचे सुमारास हा अपघात झाला अपघातग्रस्त टँकर (क्रमांक एम.एच.१४.डी.एम.१९०४) हा सातारा येथून दूध घेऊन मुंबईला वारजेचे दिशेने चालला होता. वडगाव बुद्रुकजवळ येताच या टँकरचा टायर फुटल्याने टँकरला जोरदार हादरा बसला व त्याचे केबीन तुटले व लगेचच तो टँकर पलटी झाला. या अपघातात अपघातग्रस्त टँकरचाचालक जखमी होऊन तुटलेल्या केबीनमध्येच अडकला. त्यानंतर येथे वाहनांच्या रांगा लागून काही वेळ वाहतूककोंडीही झाली. चालकास केबिनमधून बाहेर काढण्यासाठी पोलीस व स्थानिक नागरिकांनी कसोशीने प्रयत्न केले. वाहनांची कोंडी व सांडलेल्या दुधाचा वाहणारा पाट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने तासभर येथे वाहतूककोंडी झाली होती. वारजे ते नवीन कात्रज बाह्यवळण मार्गावर सतत कोठेना कोठे अपघात होत असल्याने रस्ते प्राधिकरणासमोर अपघातांची ही मालिका थांबविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मागील आठवड्यात याच परिसरात ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन एका मुलीला जीव गमवावा लागला होता. बस उलटली -वृत्त/७
रस्त्यावर दूधाचे पाट
By admin | Published: January 24, 2016 2:09 AM