भुलेश्वर कोविड सेंटरमध्ये नियमित तपासणी, औषधोपचार, नाश्ता, दोन वेळचे जेवण, टीव्ही सुविधा, त्याचबरोबर आता विविध पुस्तकांचे वाचन करता येणार आहे. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे, कै. तानाजी अप्पा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक आबनावे, टेकवडीचे उपसरपंच सूरज गदादे, शिक्षक नेते गणेश लवांडे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, माळशिरस विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष भरत यादव, डॉ. मृणाली झांबरे, डॉ. वैशाली माने, परिचारिका दीपाली झेंडे, डॉ. निर्मळ आबनावे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ - माळशिरस येथील कोविड सेंटरमध्ये पुस्तक वाटप करण्यात आले.