संगीत हा आविष्कार माणसाला संपन्न बनविणारा आहे. मनुष्याच्या निर्मितीनंतर माणसाला निसर्गातील पानांचा सळसळ, पाण्याचा खळखळाट, वाऱ्याचा सुसाट आवाज अशा अनेक संगीताने प्रेमात पाडले आणि संगीत माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य कला बनली. याच संगीतातून सर्वप्रथम लोकधुनाचा जन्म झाला आणि त्या लोकधुनातून रागनिर्मिती झाली. लोकधून ही सहज, साधी सोप्पी, तर रागसंगीताला शास्त्रीय आणि बौद्धिक आधार आहे. या दोन्ही संगीताची निर्मिती, त्यांच्यातील भेद आणि विश्लेषणात्मक अभ्यास म्हणजे डॉ. साधना शिलेदार लिखित ‘लोकधुनातून रागनिर्मिती’ हे पुस्तक राजहंस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले डॉ. साधना शिलेदारांचे ‘लोकधुनातून रागनिर्मिती’ हे पुस्तक वाचणे म्हणजे लोकधून आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची विस्तृत पर्वणीच आहे. त्यामुळे रागधारी संगीतामध्ये रुची असणाऱ्या साऱ्याच लोकांनी आवर्जुन वाचावे असे पुस्तक ठरले आहे.
रागाची रचना आपण तयार करावी किंवा नव्या रागाची निर्मिती करावी अशी स्वाभाविक अपेक्षा प्रत्येक संगीतकाराची, गायकांची असतेच, मात्र लोकधुनातून रागांची निर्मिती करण्याची हतोटी कुमारगंधर्वांसारख्या कलाकारांना सहज साध्य झाले. लेखिकेचा बालपणापासून कुमारगंधर्व यांच्या गायकीशी आलेला जवळचा सबंध आणि त्यांच्या गायकीचा अभ्यास यामुळे हा विषय अधिक सोपेपणाने मांडू शकल्या असे पुस्तक वाचविताना जाणवते. रागांच्या निर्मितीचे स्रोत, लोकसंगीताचे स्वरूप, लोकसंगीत व इतर गायनशैली यांचा संबंध, धुउगम रागाच्या संदर्भात कुमारगंधर्व यांचे कार्यक, लोकधुनांच अभ्यास निनी धुनउगम राग आदी भागातून पुस्तकांमध्ये संगीताची माहिती अधिक सोपेपणाने मांडण्याचा उत्तम प्रयत्न लेखिकेने केला आहे.
संशोधनाच्या निमित्ताने साकारलेल्या प्रबंधातून या पुस्तकाची निर्मिती झाल्याने यातील प्रत्यके मुद्याला विशेष संदर्भ आणि अभ्यासाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे पुस्तक अधिक वाचनीय झाले आहे.