लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : पुणे ग्रामीण भागातील मटका, बेकायदा दारूविक्री आदी अवैध धंदे बंद झाल्याचे चित्र वरकरणी दिसत असले, तरी इंदापूर तालुक्यातील चलाख मटका चालकांनी चिठ्ठीद्वारे चालणाऱ्या मटक्याला सोडचिठ्ठी देत, मोबाईल एसएमएसद्वारे मटका चालू केला आहे. मटक्याच्या धंद्यातील पंटर लोक हॉटेलात, स्टँडवर, अगदी चौकाचौकातील रिक्षात बसून, मोबाईलवरुन थेट ‘बुकिंग’ मालकांकडे पोहोचवताना दिसत आहेत. ते रात्रीअपरात्री पोलीस ठाण्याच्या आवारात फिरत साळसुदपणाचा आव आणत आहेत. आदमासे सहा महिन्यांपासून सुवेझ हक यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या धसक्याने कारवाई होण्याआधीच येथील मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री बंद झाली. तथापि ही परिस्थिती काही काळापुरतीच टिकली. मटक्याच्या धंद्यातील लोकांनी पंटर लोकांना मोबाईलद्वारे एसएमएस, व्हॉट्सअॅप, मोबाईल कॉलद्वारे मटका घेण्याची आयडिया दिली. इंदापूर तालुक्यातील भिगवण, वालचंदनगर, बावडा, निमगाव केतकी, भवानीनगर व इंदापूर शहरात हा मोबाईल मटका अगदी जोरात चालू आहे.
इंदापुरात एसएमएसद्वारे मटक्याचे बुकिंग
By admin | Published: July 07, 2017 3:08 AM