---
पुणे : मागील संपूर्ण शैक्षणिक वर्ष कोरोना कालावधीमुळे शाळा बंद राहिल्या. मात्र, ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू राहील, अशी घोषणा करत अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली होती, यंदाही अनेक शाळांनी पंधरा जूनपासून अर्थात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली. मात्र, आता पुढच्या आठवड्यात पुस्तके मिळणार असून, सर्वांत आधी त्यांचे वितरण आदिवासी भागात करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे बालभारतीची पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर सर्वांत पहिल्यांदा त्याचे वितरण
गेल्या वर्षाी कडक लॉकडाऊनमध्ये विद्यार्थाी शाळेत येऊ शकले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाऊन पुस्तक वाटप करण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन शिक्षणामुळे येणाऱ्या अनंत अडचणीमुळे अनेक शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य झाले नाही. यंदा ऑॅनालाईन शिक्षणाची तयारी शिक्षकांनी आधीपासूनच केली असून, त्याचे वेळापत्रक बनवले व त्यानुसार ऑॅनलाईन शाळा सुरू झाल्या. मात्र, पाठ्यपुस्तक उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
--
चौकट
जिल्हा परिषदेने बालभारतीकडे विविध माध्यमांच्या चार लाख २८ हजार ४४७ पुस्तक संचाची मागणी केली आहे. बालभारतीकडे मराठी विषयाचे ४ लाख ८ हजार ५३४ पुस्तकांचा संचाची मागणी करण्यात आली. हिंदी दोन हजार ९०९, इंग्रजी १२ हजार ६८, उर्दू ४ हजार ८०८, तमीळ १२८ संचाची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही पुस्तके मिळाले नाहीत. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांत सर्वप्रथम एक लाख ६८ हजार ३०२ पुस्तक संचांचे वितरण प्राधान्य केले जाणार आहे. त्यात सर्वप्रथम भोर तालुक्यात १४ हजार ८८२ पुस्तके वितरण केले जाणार आहे. त्यानंतर वेल्हा तालुक्यात तीन हजार ८७, मुळशीमध्ये २० हजार ६८३, आंबेगावमध्ये २० हजार ४१, जुन्नर ३३ हजार ५८०, खेडमध्ये ४९ हजार ९०२ व मावळ तालुक्यात २२ हजार २५९ पुस्तक संचाचे वितरण करण्यात येणार आहे.