लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र, आता कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणत्या पोषक आहाराची शरीराला गरज आहे? याची माहिती लोकमत इव्हेंटफुल फेसबुक पेजवर होणाऱ्या कार्यशाळेतून मिळणार आहे.
‘लीज ब्युटी सेंटर अँड स्पा’च्या प्रमुख लीना खांडेकर या कार्यशाळेतून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (दि. ८ मे) सायंकाळी सहा वाजता ही कार्यशाळा सुरू होणार आहे. लियाज न्यूट्रा कॉस्मॅटिकच्या ‘जीमाईन सी प्लस’ हे एक न्यूट्रीशनल सप्लिमेंट (पोषण आहार) सादर करण्यात आले आहे. या पोषण आहारातील घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात. दोन-तीन वर्षांपूर्वी या उत्पादनाचे संशोधन लियाजकडून करण्यात आले आहे. कोरोनाकाळात आवश्यक पोषण घटकांची गरज लक्षात घेऊन हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे. हे उत्पादन अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
कोरोनाकाळात रोगप्रतिकारकक्षमता वाढवण्याची गरज असल्याने लोकमत इव्हेंटफुल पेजवर लाईव्ह कार्यक्रम शनिवारी (दि. ८ मे) सायंकाळी सहा वाजता पाहण्यास विसरू नका.
फोटो - लीना खांडेकर
---------------------------------------------------------