शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

बोपखेल, चक्रपाणी, वैदूवस्ती अनुसूचित जमातीसाठी आरक्षित

By admin | Published: October 05, 2016 1:09 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी होणार आहे. सोडतीपूर्वी दोन दिवस अगोदरच अनुसूचित जातींचे २० आणि जमातींचे ३ प्रभाग कोणते असतील, याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. दिघी बोपखेल, भोसरी चक्रपाणी वसाहत, वैदूवस्ती पिंपळे गुरव हे प्रभाग अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणार आहेत. उर्वरित अनुसूचित जमातींचे वीस प्रभाग भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभांत असणार आहे. सर्वाधिक प्रभाग हे पिंपरीत आणि त्यानंतर चिंचवड आणि भोसरीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच प्रारूप प्रभाग आराखडा फुटल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये जुंपली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, हा आरोप भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांवर करीत आहे. प्रभागरचनेचा आराखडा फुटल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्गात खळबळ उडवून दिली होती. आरक्षणांची सोडत ही शुक्रवारी होणार आहे. मात्र, अनुसूचित जाती आणि जमातींच्या २३ प्रभागांची माहिती मिळाली आहे. ही आरक्षणे अंतीम असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. याबाबत अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार १२८ वॉर्डांत चार याप्रमाणे ३२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी २३ जागांची आरक्षणे कोणत्या प्रभागात असतील, ही माहिती लोकमतला मिळाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जमातींच्या तीन जागा असून, ४, ६,२९ हे प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातींसाठी १,४,८,९,१०,११,१३,१६,१९,२०,२१,२३,२४,२५,२६,२७,२८,३०,३१,३२ हे प्रभाग आरक्षित असणार आहेत.दिघी बोपखेलमधील चार जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती आणि एक जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा नागरिकांचा मागासवर्ग आणि एक जागा खुल्या वर्गासाठी आरक्षित असणार आहे.  आरक्षित झालेले प्रभाग अनुसूचित जमातींचे प्रभाग १) दिघी, बोपखेल : ४, २) भोसरी, चक्रपाणी वसाहत : ६, ३) वैदूवस्ती, क्रांतीनगर, जवळकरनगर : २९.अनुसूचित जातींचे प्रभाग १) तळवडे चिखली परिसर : १, २) दिघी बोपखेल परिसर : ४, ३) जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा भोसरी परिसर : ८, ४) मासूळकर कॉलनी, अजमेरा पिंपरी परिसर : ९, ५) संभाजीनगर, शाहूनगर परिसर : १०, ६) अजंठानगर, कृष्णानगर परिसर : १ १, ७) निगडी यमुनागनर परिसर : १३, ८) किवळे मामुर्डी, रावेत परिसर : १६, ९) उद्योगनगर, भाटनगर, आनंदनगर : १९, १०) संत तुकारामनगर, फुलेनगर, महेशनगर परिसर : २०, ११) पिंपरीगाव, अशोक थिएटर परिसर : २ १, १२) डांगे चौक, शिवतीर्थनगर, थेरगाव परिसर : २३, १३) गणेशनगर, पडवळनगर, बेलठिकानगर परिसर : २४, १४) पुनावळे, ताथवडे परिसर : २५, १५) पिंपळे निलख कस्पटेवस्ती परिसर : २६, १६) काळेवाडी, तापकीरनगर, रहाटणी परिसर : २७, १७) पिंपळे सौदागर, शिवार गार्डन परिसर : २८, १८) दापोडी, फुगेवाडी, कुंदननगर परिसर : ३०, १९) नवी सांगवी, कीर्तीनगर, विनायकनगर परिसर : ३१, २०) सांगवी गावठाण, ढोरेनगर, पिंपळे निलख दापोडी पुल परिसर : ३२.