भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे निवेदन
बारामती: बोरगाव (ता. माळशिरस) मातंग समाजातील व्यक्तीचे प्रेत स्मशानभूमीमध्ये दहन न करण्यासाठी मज्जाव करणाऱ्या, तसेच जिवती (जि. चंद्रपूर) येथे भानामतीच्या संशयावरून दलित महिलांना व वृद्धांना बांधून मारहाण करणाऱ्यांचा भाजप पुणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
बोरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) मातंग समाजाचे माजी सरपंच दशरथ साठे यांच्या बंधूचे रात्री २ वाजता निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये घेऊन चालले असता काही समाजकंटकांनी व प्रशासनाने रस्ता अडवून प्रेताची विटंबना केली आहे. त्यामुळे संतप्त जमावाने सदर प्रेताचा अंत्यविधी ग्रामंपचायत कार्यालयासमोरच केला आहे. तरी वरील जातीयवादी प्रवृत्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच, महाराष्ट्रात अनुसूचित जातीवर होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्यास महाराष्ट्र शासन कुचकामी पडले आहे. त्यामळे महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. तरी संबंधित दोन्ही प्रकरणांतील दोषींव्यक्तीवर तसेच प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
बारामती येथील भाजप अनुसूचित ग्रामीण जाती मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
२५०८२०२१-बारामती-०१