अतुल मारवाडीपिंपरी (पुणे) : इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतोच, असाच संदेश देणारी व्यक्ती आहे भोसरी येथील आनंद शर्मा. जन्मतः दोन्ही हात नसतानाही जिद्दीने त्याने जे काही केलं ते पाहून अनेकजण थक्क होतात.
आनंदला निगडी यमुनानगर येथील अपंग विद्यालयात सर्व कामे पायांनीच करायचे ‘धडे’ मिळाले. त्याने ‘बी.कॉम.’पर्यंत शिक्षण घेतले. नववी-दहावीत असताना मित्र क्रिकेट खेळत असताना तो त्यांचा खेळ पाहायचा. असेच एकदा मित्र त्याला म्हणाले, ‘अरे नुसताच बघतोस काय, खेळायला ये.’ त्यानंतर आनंदही मैदानात उतरला आणि त्याला जगण्यातील खरा ‘आनंद’ गवसला.
पायाला चप्पल बांधून प्रॅक्टिसआनंदने सुरुवातीला काही चेंडू कमी वेगाने टाकण्यास सांगून ते चेंडू पायाने टोलवले. चेंडूचा मार लागू नये म्हणून मित्रांनीच आनंदच्या पायाला चप्पल बांधली. त्यामुळे चेंडूचा मार पायाला लागत नव्हता. त्यामुळे आनंदचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. हात नसतानाही उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी करत आनंद क्रिकेटचे मैदान गाजवतोय.
फुटबॉलचे सामने पाहताना सुचली पायाने बॅटिंग करायची आयडिया nआनंदला मित्रांनी सुरुवातीला चेंडू फेकण्यासाठी प्रेरित केले. पण बॅटिंगचं काय ते कसं करायचं, असा प्रश्न होता. बॅटिंग करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. फुटबाॅलचे सामने पाहत असताना त्याला अचानक पायानेच बॅटिंग करण्याचे सुचले. nत्यानुसार त्याने पायाचा बॅटसारखा वापर सुरू केला. त्यासाठी मित्रांनी त्याला मदत केली. त्यामुळे बॅटिंगची प्रॅक्टिस जोरदार झाली आणि आनंद त्यांच्या क्रिकेट टीममधील उत्तम फलंदाज झाला. आनंद फलंदाजीसाठी मैदानात उतरणार म्हटल्यावर त्याच्या मित्रांसह बघ्यांनाही मोठी उत्सुकता असते.