पुणे : वस्ती भागात व्यवसाय केल्यास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव देऊनही बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवून आगीच्या घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नजीर मोहंमद शेख (वय ४८, रा. गणेश पेठ), रघुनाथ रामचंद्र ओझा (वय ४८, रा. १०३ भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी इम्तियाज खान (वय ५५ रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळे- मागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने, लाकडाचे गोडाऊन आणि ३५ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेनंतर सिलिंडरचे दोन स्फोट झाल्याने आग अधिक भडकली. या भट्टीच्या शेजारी असलेल्या फिर्यादी यांच्या घरासह अन्य रहिवाशांची राहती घरे, शेड व गृहोपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून १४ लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीस जबाबदार ठरवित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आगप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: April 27, 2017 5:10 AM