चाकण : नाणेकरवाडी येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सासू व नवऱ्यास अटक करण्यात आली. नवरा- संजय अमृत जाधव व सासू गिताबाई अमृत जाधव यांच्यावर भा.द.वि. कलम ४९८ व ३०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मंगल संजय जाधव (वय३३) हिचे वेळोवेळी मारहाण करुन जगणे असहय्य केले व आत्महत्येस प्रवृत्त केले. दि. २३ मार्च २०१५ रोजी मंगल हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ससून रुग्णालयात उपचार चालू असताना २७ मार्च, २०१५ रोजी तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: March 30, 2015 5:29 AM