शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कंटेनर-डंपरच्या धडकेत दोघे ठार

By admin | Published: May 12, 2017 4:49 AM

शिरूर-न्हावरे रस्त्यावर करडे घाटाजवळ कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : शिरूर-न्हावरे रस्त्यावर करडे घाटाजवळ कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. या अपघातावेळी एक कार कंटेनरला मागील बाजूने धडकली. सुदैवाने यात कारचालक बचावला, तो किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे अडीच तास वाहतूक ठप्प झाली.डंपरचालक सुनील पवार (रा. सरदवाडी, शिरूर, मूळ रा. परभणी) व कंटेनरचालक सोनुप्रसाद शिवशंकर शर्मा हे दोघे जागीच ठार झाले. आज सकाळी सकाळी अकराच्या दरम्यान सरदवाडी येथील रवींद्र कर्डिले यांच्या खडी क्रशरमधन खडी भरलेला डंपर घेऊन चालक पवार हा न्हावरे बाजूला निघाला होता. याच दरम्यान कन्ट्रीलाइन लॉजिस्टीक कंपनीचा माल भरलेला कंटेनर करडे घाट उतरुन शिरूरच्या दिशेने जात असताना घाटाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. यात दोघेही चालक अडकले. जबर मार लागल्याने दोघेही जागेवरच मृत पावले. कंटेनरला मागील बाजूने येणारी एक कार या अपघाातामुळे कंटेनरला धडकली. यात कारचालक किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली. तत्पूर्वी रवींद्र कर्डिले व त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहोचले. वाहनांत अडकून पडलेल्या वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस येण्यापूर्वी व आल्यानंतरही आसपासच्या ग्रामस्थांनी, तरुणांनी घटनास्थळी मदतीचा हात दिला. कर्डिले यांच्यासह बंटी कुंडलिक, अमोल वर्पे, दत्ता केदारी, सुभाष चौधरी, संतोष सरोदे, राहुल महाजन यांच्यासह इतर तरुणांनी चांगली मदत केली. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.शिरूर-न्हावरे या रस्त्यावर न्हावरे-फाटा ते न्हावरे (चौफुला) या रस्त्यावर दोन मोठी वाहने समोरासमोरून जाताना अगदी खेटून जातात. यात अतिवेग असेलतर अपघाताची शक्यता संभवतेच.